नुकतेच Google ने सांगितले की ते मे 2022 पासून Android फोनमधील सर्व थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग बंद करणार आहे. Google ने हे देखील स्पष्ट केले आहे की जर तुमच्या फोनमध्ये इन-बिल्ट कॉल रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकाल, परंतु Truecaller किंवा Call Recorder अॅप सारख्या कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. गुगलने प्ले स्टोअरचे गोपनीयता धोरण बदलले आहे.
गुगलच्या नवीन पॉलिसीबाबत Truecaller ने म्हटले आहे की आता कॉल रेकॉर्डिंगची सुविधा त्यांच्या अॅपमध्ये उपलब्ध होणार नाही. Google चे नवीन धोरण 11 मे पासून लागू केले जात आहे, म्हणजेच 11 मे 2022 नंतर Truecaller चे वापरकर्ते कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. Google देखील 11 मे पासून API चा ऍक्सेस बंद करत आहे.
Truecaller सारखे अॅप कॉल रेकॉर्डिंगसाठी API वापरत होते. Truecaller ने सांगितले आहे की Truecaller वर कॉल रेकॉर्डिंग सर्वांसाठी विनामूल्य होते, परंतु आता अपडेट केलेल्या Google च्या डेव्हलपर प्रोग्राम धोरणांनुसार, आम्ही यापुढे कॉल रेकॉर्डिंग सुविधा प्रदान करण्यास सक्षम नाही.
आता सर्व कॉल रेकॉर्डिंग अॅप्स देखील Google Play Store वरून काढून टाकले जातील. यूजर्सची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे गुगलने म्हटले आहे.