Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असे करा आपले व्हॉट्सअॅप सुरक्षित

असे करा आपले व्हॉट्सअॅप सुरक्षित
, शनिवार, 1 जुलै 2017 (08:58 IST)

व्हॉट्सअॅप नंबरचे अकाऊंट काही सायबर क्रिमिनल हॅक करत आहेत. तर त्या अकाऊंट वरून नंबरसोबत निगडीत सर्व इतर नंबरअसलेल्या इतरांना अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण, शिवीगाळ पाठवली जात आहे. त्याचा मोठा फटका नाशिक येतील ४० पेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. या सर्वांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे.त्यामुळे असा त्रास होवू नये म्हणून काही सुरक्षा टिप्स खालील प्रमाणे आहेत :

 हॅक झाल्यास काय कराल?

  1. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा.
  2. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.
  3. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका, तर व्हॉट्सअॅप मध्ये टू वे सेक्युरेटी नावाचा प्रकार आहे,त्यामध्ये जर रजिस्टर केले तर ते चोरट्यांना हॅक करणे अवघड होते हॅक करता येत नाही.
  4. सर्वात महत्वाचे आपल्या मोबाईलव येणारा व्हेरिफिकेशन कोड हा स्वतः साठीच असतो कोणतही बँक संस्था,सरकारी अधिकारी, अगदी कोणीही तो तुमच्या कडे मागू शकत नाही त्यामुळे तो कोड कोणालाही देवू नकाच.
  5. आपल्या घरातील महिला, मुली यांचे सेटिंग सेक्युर करून घ्या.त्यांना विश्वासात घेवून हे सर्व सांगा त्यामुळे त्यांना असा मनस्ताप बोगावा लागणार नाही.
  6. आपल्याला कोणताही कॉल आला तर कोणालाही कोणताही otp (सहा आकडी क्रमांक ) ओटीपी देवू नका, तो फक्त तुम्हीच वापरू शकता इतर कोणीहो नाही.
  7. कोणत्याही अनोळखी सोबत Chat करू नका, काही शंका असल्यास घरात सांगा, अथवा पोलिसांकडे लगेच धाव घ्या नक्की मदत करतील
  8. महिलांना पुरुष पोलिस अधिकारी यांच्या कडे तक्रार करतांना त्रास अथवा शरम येते त्यामुळे तुम्ही महिला अधिकारी वर्गाकडे तक्रार करू शकता प्रत्येक ठिकाणी अधिकारी आहेत.
  9. घरातील मुलीना असा त्रास होत असेल तर कृपया शांत बसू नका, पोलिसांना वेळीच सांगा त्यामुळे अनेक अनर्थ प्रकार होणार नाही

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रपती नवडणूक, मतदानासाठी मला सोडावे = छगन भुजबळ