Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता आपल्या भाषेत बोलणार यूट्यूब...

आता आपल्या भाषेत बोलणार यूट्यूब...
आतापर्यंत आम्ही यूट्यूबवर इंग्रजी भाषेचा प्रयोग करत होतो परंतू आता लवकरच या सर्व सुविधा हिंदी आणि इतर दुसर्‍या भारतीय भाषांमध्ये मिळतील. यूट्यूब लोकेशनप्रमाणे आपल्याला पर्याय निवडायला देईल ज्याने आपण आपली भाषा सेट करू शकाल. सूत्रांप्रमाणे सध्या तरी ही सुविधा हिंदी, गुजराती, कन्नड, मलयालम, मराठी, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू भाषेत मिळेल.
 
जर आपण पहिल्यांदा यूट्यूब वापरत असाल तर आपल्या निवडलेल्या भाषेत आपल्याला विभिन्न व्हिडिओ बघायला मिळतील. जे लोकं आधीपासून हे यूज करत असतील त्यांच्या हिस्ट्रीवर नजर ठेवून व्हिडिओ सुचविण्यात येतील.
 
गूगलचा लोकांना आपल्या प्रादेशिक भाषेत व्हिडिओ दाखवण्यामागे एकमेव उद्देश्य आहे की लोकांनी व्हिडिओसाठी केवळ यूट्यूब वापरावे. याने भारतासारख्या बाजारात त्याची पकड मजबूत होईल आणि फेसबुकच्या व्हिडिओच्या पावलाआधीच त्याचा टक्कर देणे सोपे जाईल.
 
यूजर वाढविण्यासाठी अलीकडेच यूट्यूबने गो फॉर इंडिया लाँच केले आहे. याद्वारे ऑफलाईन असूनही गो यूजरला व्हिडिओ पाठवू शकतात. आपण व्हिडिओ आणि गेम्स ऑफलाईन जतनही करू शकता. यामागील कारण म्हणजे भारतात इतर देशांच्या अपेक्षा इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ट्रू मतदार अ‍ॅप’ विकसित