पबजी मोबाइल गेम खेळणाऱ्यांना आता ‘झोम्बी मोड’ हे नवं अपडेट गेम खेळणाऱ्यांसाठी कंपनीकडून जारी केलं जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून झोम्बी मोड येणार असल्याची चर्चा खेळाडूंमध्ये रंगली होती. या नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये पबजी मोबाइल व रेसिडेन्ट एव्हिल-2 एकत्र असणार आहेत. खेळाडूंना झोम्बीज गट व झोम्बीजचा बॅास टॅायरेन्ट यांच्यासोबत लढावे लागणार आहे. पबजी मोबाइलचा हा 0.11.0 व्हर्जन आहे. झोम्बी मोडव्यतिरिक्त या व्हर्जनमध्ये खेळाडूंना काही नवीन व दमदार फीर्चस दिले जाण्याची अपेक्षा आहे. नव्या अपडेटसाठी या गेमचं सर्व्हर आज काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, परिणामी हा गेम काही तासांसाठी खेळता येणार नाही.
PUBG Mobile 0.11.0 अपडेटनंतर खेळाडूंसाठी चिकन डिनर मिळवणं अर्थात विजयी होणं खडतर बनण्याची शक्यता आहे. कारण या अपडेटनंतर झोम्बीज गट आणि त्यांचा बॉस टॅायरेन्ट याचा खात्मा करायचा आहे. याशिवाय इतर खेळाडूंच्या टीमसोबतही लढावं लागणार आहे.