Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्ध्या जगात व्हॉट्सअॅपचा बोलबाला

अर्ध्या जगात व्हॉट्सअॅपचा बोलबाला
लंडन- व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपने अर्ध्या जगावर अधिराज्य गाजविले असून जगभरातील 109 देशांत व्हॉट्स अॅप वापरले जात असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे.
 
डिजिटल मार्केटिंगबाबतचा अभ्यास करणार्‍या ठसिमिलवरवेब नावाच्या कंपनीने केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. अॅड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन धारकांपैकी 94.8 टक्के जणांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप कार्यकरत असून एक व्यक्ती दररोज साधारणपणे 37 मिनिटे व्हॉट्सअॅप वर कार्यरत असल्याचेही आढळून आले आहे. ठसिमिलरवेबने जगातील 187 देशांचा अभ्यास केला. त्यापैकी 109 देशांत म्हणजे 55.6 टक्के देशांमध्ये व्हॉट्सअॅप लोकप्रिय असल्याचे दिसून आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जूनमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार