जगभरात इंटरनेट कनेक्शनच्या स्पीडमध्ये अमेरिका 28 व्या स्थानी असून नेटवर्क गती वाढविण्यासाठी अमेरिकेकडून कुठलीही प्रभावी उपाययोजना केली जात नसल्याची माहिती कम्युनिकेशन्स वर्कर्स ऑफ अमेरिकेच्या (सीडब्ल्यूए) अहवालातून समोर आली आहे.
दक्षिण कोरिया याबाबतीत आघाडीवर असून त्यांचा सरासरी डाउनलोड स्पीड 20.4 मेगाबाइट प्रती सेकंद (एमबीपीएस) आहे. अमेरिकेची गती सरासरी 5.1 मेगाबाइट प्रती सेकंद आहे. जापान, दक्षिण कोरिया पेक्षा अमेरिका मागे असून या देशांचा डाउनलोड स्पीड 15.8 एमबीपीएस आहे. तर स्वीडनचा सरासरी स्पीड 12. 8 एमबीपीएस आहे.