Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कूलपॅडचा व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट

कूलपॅडचा व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट
कूलपॅडने भारतात स्मार्टफोनसाठी फक्त 999 रुपयांमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लॉन्च केला आहे. ज्या स्मार्टफोनची स्क्रीन साइज 4.7 आणि 5.7 इंच यादरम्यान एचडी रिझोल्यूशनसोबत आहे, त्या सर्व स्मार्टफोनसाठी कूलपॅडच्या या डिव्हाईसचा वापर होऊ शकतो. रिअॅलिटी हेडसेट नोट 3, नोट 3 लाइट आणि नोट 3 प्लस यांसोबतही हे डिव्हाईस यूजर्स वापरू शकतात.
 
या डिव्हाईसमध्ये कस्टमाईजेबल लेन्सचा वापर केल्याने अधिकाधिक वेळ कोणत्याही अडथळ्यांशिवाय वापर होऊ शकतो. कूलपॅड इंडियाचे सीईओ सैय्यद तजुद्दीन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, हे गॅझेट तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे आणि त्यामुळे स्वस्त दरात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. आम्ही लवकरच पॉवर बँक, स्मार्ट वॉच यांसारखे नवे प्रॉडक्ट्सही बाजारात आणणार आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हीरो जिर यंदा बाजारात दाखल होणार