Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गंमत नावातली

गंमत नावातली
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (16:42 IST)
आपण वेगवेगळ्या  बेवसाईट्स वापरतो. काही वेबसाईट्‍सची नावं गमतीशीर असतात तर काहींच्या नावांना काहीच अर्थ नसतो. अशाच काही वेबसाईट्सच्या नावांमागच्या गमतीजमती जाणून घेऊ या.... 
* याहू या वेबसाईटचं नाव याहूज वरून घेण्यात आलंय. याहूज हा वन्य प्राणी आहे. याहूज या शब्दाचा अर्थ विचित्र असा आहे. बहिष्कार टाकलेला आणि गावंढळ म्हणजे वाहूज. 
webdunia
* ट्विटर हे सोशल नेटवर्किंग साईटचं असंच एक गमतीशीर नाव. ट्विटरला आधी स्टेटस आणि नंतर ट्विटेक असं नाव दिलं जाणार होता. ट्विटरच्या संस्थापकांनी स्टेटस हे नाव घेऊन अजून चांगलया नावासाठी डिक्शनरीचा शोध घेतला. मित्रांशी संवाद साधत असल्याची आणि आपल्या आवाज सगळीकडे घुमत असल्याची जाणीव युजर्सना व्हावी यासाठी ट्विटर या शब्दाची निवड करण्यात आली. पक्ष्यांच्या किलबिलाटाला ट्विटर असं म्हटलं जातं. 
 
webdunia
* एका कंपनीत काम करत असताना अॅपल या कंपनीचे संस्थापक स्टिव्ह जॉब्सच्या डोक्यात अॅपल हा शब्द आला आणि आपल्या कंपनीचं नाव अॅपल कॉम्प्युटर्स असावं असं मत बनवलं.
webdunia
* गुगोल या शब्दापासून गुगल या शब्दाची निर्मिती झाली आहे. गुगोल ही एक संख्या आहे. यात एक आकड्यामागे 100 शून्यं असतता. गुगलच्या संस्थापकांनी आधी कंपनीच नाव बॅक रब असं ठरवलं होतं. त्यानंतर गुगल हे नाव ठेवण्यात आलं. 
webdunia
* व्हिडिओ कॉलिंगची सोय उपलब्ध  करून देणार्‍या स्काईपचं नाव आधी स्काय पीर टू पीर असं ठेवर्यात आलं होतं. हे नाव बदलून  स्कायपर ठेवण्यात आलं. काही अटींमुळे शेवटचं आर हे अक्षर गळलं आणि स्काइप प्रचलित झालं.    

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलेचा दावा: पोकेमॉन ने केला बलात्कार