Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कृष्णाचे त्वरित असरकारी धन प्राप्तीचे मंत्र

कृष्णाचे त्वरित असरकारी धन प्राप्तीचे मंत्र

वेबदुनिया

येथे आम्ही तुमच्या माहितीसाठी कृष्णाचे विभिन्न मंत्र दिले आहे. या मंत्राचे जप केल्याने धन - संपदा-सुख-सौभाग्य-सौंदर्याची प्राप्ती होते. शुभ प्रभाव वाढवण्यात व सुख देण्यात हे मंत्र अत्यंत प्रभावशाली मानण्यात आले आहे. वाचकांच्या सुविधेसाठी आम्ही येथे मंत्रांशी संबंधित माहिती दिली आहे. 

श्रीकृष्णाचे मूलमंत्र : अडकलेले धन मिळवून देणे

'कृं कृष्णाय नमः'

हे कृष्णाचे मूलमंत्र आहे. या मूलमंत्राचा जप प्रत्येक मनुष्याला आपण सुखी असो म्हणून पहाटे नित्यकर्म व स्नान इत्यादी करून 108 वेळा करायला पाहिजे. असे केल्याने मनुष्य सर्व बाधांपासून नेहमी मुक्त राहतो. या मंत्राचा जप
केल्याने कुठेही अडकलेले पैसे परत मिळतात.

सप्तदशाक्षर श्रीकृष्णमहामंत्र : करोडपती बनण्यासाठी हे मंत्र 

'ऊं श्रीं नमः श्रीकृष्णाय परिपूर्णतमाय स्वाहा'

हा कृष्णाचा सप्तदशाक्षर महामंत्र आहे. या मंत्राचे जर पाच लाख जप केलेतर नक्कीच हा मंत्र सिद्ध होतो. जप करताना
हवनाचा दशांश अभिषेकाचा दशांश तरपण व तर्पणचा दशांश मार्जन करण्याची विधी शास्त्रात दिली आहे. ज्या व्यक्तीला हा मंत्र सिद्ध हो तो मग तो नक्कीच करोडपती बनतो.
 
सात अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : धन प्राप्तीसाठी दिवसभर याचा जप करावा 

'गोवल्लभाय स्वाहा'

श्रीकृष्णाच्या या सात अक्षरांच्या मंत्राचा जप जो व्यक्ती करतो त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होते. तसेच धनाची इच्छा बाळगणार्‍या व्यक्तीला या मंत्राचा निरंतर जप करायला पाहिजे. मंत्राचे सव्वा लाख जप झाल्यावर आर्थिक स्थितीत आश्चर्यकारक सुधारणा होण्यास सुरुवात होते. 
पुढील पानावर पहा संपूर्ण इच्छा पूर्ण करणारा कृष्ण मंत्र

webdunia
WD
आठ अक्षरांचे श्रीकृष्ण मंत्र : सर्व इच्छा पूर्ण करणारा मंत्र

'गोकुल नाथाय नमः'

या आठ (8) अक्षरांच्या श्रीकृष्णमंत्राचा जप जो साधक करेल त्याच्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात.

webdunia
WD
दशाक्षर श्रीकृष्ण मंत्र : धन-धान्य देणारा मंत्र

'क्लीं ग्लौं क्लीं श्यामलांगाय नमः'

हे दशाक्षर (10) मंत्र श्रीकृष्णाचा आहे. या मंत्राचा जप जो कोणी व्यक्ती करतो त्याला संपूर्ण सिद्धी प्राप्त होते. तसेच हे मंत्र आर्थिक चणचण दूर करण्यास मदत करतो. हे मंत्र केल्याने धन-धान्यात वृद्धी होते.

webdunia
WD
द्वादशाक्षर श्रीकृष्ण मंत्र : हा मंत्र केल्याने प्रेम विवाह होतो

'ॐ नमो भगवते श्रीगोविन्दाय'

या कृष्ण द्वादशाक्षर (12) मंत्राचा जप जो कोणी साधक करतो, त्याला संपूर्ण सुख मिळते. हा मंत्र प्रेम विवाह जुळवून आणण्यास चमत्कारी सिद्ध होतो.

webdunia
WD
बावीस अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : वाणीचे वरदान देणारा आहे

'ऐं क्लीं कृष्णाय ह्रीं गोविंदाय श्रीं गोपीजनवल्लभाय स्वाहा ह्र्सो।'

हा बावीस (22) अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र आहे. जो कोणी साधक या मंत्राचा जप करतो त्याला वागीशत्व (वाणीचे वरदान)ची प्राप्ती होते.

पुढील पानावर पहा प्रत्येक अडचणींना दूर करणारे श्रीकृष्ण मंत्र


webdunia
WD
23 अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : प्रत्येक अडचण दूर करतो

'ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीकृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय श्रीं श्रीं श्री'

हा तेवीस (23) अक्षरांचा श्रीकृष्णाचा मंत्र आहे. जो कोणी या मंत्राचा जप करतो त्याला धनाची प्राप्ती होते व त्याच्या समस्त अडचणी दूर होतात. पैसा स्वतः.चालून त्याच्याकडे येऊ लागतो.

webdunia
WD
28 अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : इच्छित फलांच्या प्राप्तीसाठी

'ॐ नमो भगवते नन्दपुत्राय आनन्दवपुषे गोपीजनवल्लभाय स्वाहा'

हे अठ्ठावीस (28) अक्षरांचा श्रीकृष्णमंत्र आहे. जो कोणी साधक या मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

webdunia
WD
29 अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : स्थिर लक्ष्मीसाठी

'लीलादंड गोपीजनसंसक्तदोर्दण्ड बालरूप मेघश्याम भगवन विष्णो स्वाहा।'

हा एकोणतीस (29) अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र आहे. या श्रीकृष्ण मंत्राला जो कोणी व्यक्ती एक लाख जप करताना तूप, साखर व मधात तीळ व अक्षता घालून होम करतात, त्यांना स्थिर लक्ष्मी अर्थात स्थायी संपत्तीची प्राप्ती होते.

पुढील पानावर पहा सर्व अडचणींना दूर करणारा कृष्ण मंत्र


webdunia
WD
32 अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र : सर्व आर्थिक अडचणींना दूर करणारा मंत्र

'नन्दपुत्राय श्यामलांगाय बालवपुषे कृष्णाय गोविन्दाय गोपीजनवल्लभाय स्वाहा।'

हा बत्तीस (32) अक्षरांचा श्रीकृष्ण मंत्र आहे. या मंत्राचा जप जो कोणी साधक एक लाख वेळा करतो आणि पायास, दूध व साखर निर्मित खिरीने दशांश हवन करतो त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात.

webdunia
WD
33 अक्षरांचा वाला श्रीकृष्ण मंत्र : विद्या प्राप्तीसाठी

'ॐ कृष्ण कृष्ण महाकृष्ण सर्वज्ञ त्वं प्रसीद मे। रमारमण विद्येश विद्यामाशु प्रयच्छ मे॥'

हा तैतीस (33) अक्षरांचा श्रीकृष्णमंत्र आहे. या श्रीकृष्णमंत्राचा जप जो कोणी साधक करतो त्याला सर्व विद्या प्राप्त होतात. हा मंत्र गुपित मानण्यात आला आहे. हा जप तुम्ही करत आहे हे कुणाला माहीत पडायला नको.

webdunia
WD
श्रीकृष्णाचे परिधान

॥ कृष्णःकर्षति आकर्षति सर्वान जीवान्‌ इति कृष्णः॥
॥ ओम्‌ वेदाः वेतं पुरुषः महंतां देवानुजं प्रतिरंत जीव से॥

कृष्णाची पूजा त्रिकाल संध्या (तिन्ही वेळा) करायला पाहिजे. राधा-कृष्णाला सोमवारी - पांढरे वस्त्र, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी पांढरा, शनिवारी निळा व रविवारी लाल वस्त्रांद्वारे शृंगार केला पाहिजे. (समाप्त)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावण रविवारी काय करावे