Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021 : पूजा शुभ मुहूर्त, शुभ संयोग

श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021 : पूजा शुभ मुहूर्त, शुभ संयोग
, सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (15:36 IST)
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
 
यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण 30 ऑगस्ट रोजी, सोमवारी आहे. जन्माष्टमीचा शुभ योगायोग, शुभ वेळ आणि उपवासाची वेळ जाणून घ्या-
 
जन्माष्टमी शुभ संयोग-
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सकाळी 07 वाजून 47 मिनिटानंतर हर्षण योग बनत आहे. ज्योतिष शास्त्रात हर्षण योग बेहद शुभ असल्याचे मानले गेले आहे. या योगात केलेल्या कार्यात यश प्राप्ती होते. जन्माष्टमीला कृत्तिका आणि रोहिणी नक्षत्र असेल.
 
अष्टमी तिथी-
पंचांगाप्रमाणे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रविवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटापासून सुरु होईल तर 30 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजून 59 मिनिटावर संपेल. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्य रात्री झाला होता आणि व्रत उदया तिथीमध्ये ठेवणे उत्तम मानले जाते. म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी सण 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.
 
जन्माष्टमी 2021 पूजा मुहूर्त-
यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटावर रात्री 12 वाजून 44 मिनिटापर्यंत राहील. बाळ गोपाळच्या पूजेची अवधी 45 मिनिट आहे.
 
व्रत पारण वेळ-
श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत पारण वेळ 31 ऑगस्ट रोजी सकाळी 09 वाजून 44 मिनिटानंतर करता येईल. या दरम्यान रोहिणी नक्षत्र समाप्त होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावण महिन्यात महामृत्युंजयमंत्राची 13 वैशिष्ट्ये जाणून घेऊया..