भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात.पृथ्वीला पापापासून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूने कृष्ण म्हणून मानवी अवतार घेतला.भगवान श्री कृष्णाचा जन्म श्रावण कृष्णपक्षातील अष्टमीला रात्री 12 वाजता झाला.दर वर्षी या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो.यंदाचा वर्षी 30 ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
भगवान श्री कृष्णाचे संपूर्ण जीवन मानवजातीसाठी विशेष शिकवण देणारे आहे.सुदामाशी मैत्री असो किंवा अर्जुनाला गीतेचे ज्ञान देणे असो, भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचा प्रत्येक क्षण नक्कीच काहीतरी ना काही शिकवतो. धार्मिक तज्ञ म्हणतात की जर कोणी श्रीकृष्णाने दाखवलेल्या मार्गावर चालले तर जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात श्री कृष्णाच्या जीवनातील काही गोष्टींचा अवलंब करून एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहेत त्या गोष्टी.
1 संकटात सापडणाऱ्यांचा साथ नेहमी द्या-सर्वांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून हा धडा घ्यावा की आपण एखाद्याचा आनंदाचा भाग बनलो नाही तरी त्या व्यक्तीच्या कठीण काळात नेहमी त्याला साथ द्या.सुदामाच्या दुःखात असो,कौरवांशी लढा देताना पांडवांना साथ देणे असो,भगवान श्रीकृष्ण नेहमी आपल्या मित्रांच्या दुःखात त्यांना साथ देताना दिसतात.
2 एखाद्याला मनापासून मित्र बनवा,त्याच्या परिस्थितीला बघून नव्हे-भगवान श्रीकृष्ण हे द्वारकाधीश होते,परंतु जेव्हा त्यांचे बालसखा सुदामा त्यांना दारिद्र्याच्या अवस्थेत भेटले तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे आदरातिथ्याचं केले नाही,तर आपल्या अश्रूंनी त्याचे पाय धुतले.श्रीकृष्ण राजा होते आणि त्यांचा बाल सखा सुदामा एक गरीब ब्राह्मण होता.तरी ही त्यांनी आपल्या मैत्रीला महत्त्व दिले.
3 धर्माच्या मार्गाचे अनुसरण करा-भगवान श्रीकृष्ण नेहमी धर्माच्या मार्गावर चालले आणि त्यांनी नेहमी इतरांना देखील या मार्गावर चालण्याची शिकवणी दिली.महाभारताच्या युद्धात देखील त्यांनी नेहमी पांडवांना साथ दिला कारण पांडव हे धर्माच्या मार्गावर चालणारे होते.शेवटी या महायुद्धात अखेर धर्मच जिंकला.हेच कारण आहे की सर्व धर्मग्रन्थात नेहमी धर्मावर चालण्याची प्रेरणा देतात.
4 शांततेसाठी शेवट पर्यंत प्रयत्न करा- भगवान श्रीकृष्ण नेहमी शिकवणी देतात की कोणत्याही वादात अडकण्या ऐवजी शेवटपर्यंत शांततेने काम करण्याचा प्रयत्न करा.महाभारताच्या युद्धाच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण हे स्वता कौरवांकडे पांडवांचे शांतिदूत म्हणून गेले होते.आणि युद्धा ऐवजी शांततेपूर्ण वाद मिटविण्याचा सल्ला दिला.परंतु अधर्माच्या मार्गावर चालणाऱ्या कौरवांनी कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचा नकार दिला.परिणामी कौरवांचा नाश झाला.