Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झारखंड विधानसभा निवडणुकीत नवरा-बायको एकमेकांविरोधात मैदानात

झारखंड विधानसभा निवडणुकीत नवरा-बायको एकमेकांविरोधात मैदानात
, सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (16:13 IST)
झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 13 सीट्सवर 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून येथील भवनाथपूर मतदारसंघाची खूप चर्चा आाहे. येथे उमेदवार म्हणून नवरा-बायको एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पती मनीष कुमार यांनी नामांकन भरले तर पत्नी प्रियांका सिंह यांनी देखील निवडणूक लढण्याची इच्छा जाहिर केली. आता दोघे एकमेकांविरोधात उभे आहेत.
 
मनीष यांनी सांगितले की मी क्षेत्रात चार वर्षांपासून सक्रिय असून बायकोने देखील लढण्याची योजना आखली आहे. आम्ही दोघेही प्रचारासाठी वेगळ्याने निघतो. एका वेळेस एकाच घरी जाऊन प्रचार करत नाही. विधानसभा निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच नवरा-बायको एकमेकांविरोधात उभे राहिल्याने सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे निवडणूक फॉर्म भरण्यासाठी हे दोघे एकाच कारमधून आले होते.
 
निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रानुसार मनीष यांनी शेती आणि व्यवसाय इन्कमचे साधन असल्याचे सांगिले तसेच दोघांकडे एकूण रोख रक्कम आठ लाख रुपये आणि जवळपास चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे काही शेतजमीन आहे. प्रियंका बीएड पदवीधर आहे, तर मनीष ग्रॅज्युएट आहे. मनीष यांनी एज्युकेशनल ट्रस्ट चालवत असल्याचे देखील सांगतिले आहे.
 
मनीष-प्रियांका यांचा विवाह 2013 साली झाला असून त्यांना 4 वर्षाची मुलगी आहे. आम्ही दोघे एकमेकांविरोधात निवडणूक नक्की लढवत आहे. पण एकमेकांना हरवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आम्ही मत मागत असल्याचे दंपती सांगतात. 
 
प्रियांका यांच्याप्रमाणे प्रचार दरम्यान मी शिक्षणाबद्दल प्रचार करते आणि माझे पती रोजगारबद्दल. यंदा भवनाथपूर मतदारसंघातून 28 उमेदवार उभे असून 12 निर्दलीय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी: राज्यसभेमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा देशाला फायदा झाला