Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 16 April 2025
webdunia

PKL 2021 यू मुंबा आणि बंगाल वॉरियर्स विजयी, तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवास बरोबरीत

PKL 2021–22 1st Day Results
, गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (09:19 IST)
प्रो कबड्डी लीग (PKL) 2021 सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी धमाका झाला. पहिल्या दिवशी बंगाल वॉरियर्सने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाचा 38-33 असा पराभव केला. तसेच, याआधी तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलायवास यांच्यातील सामना 40-40 असा बरोबरीत सुटला होता आणि पहिल्या सामन्यात यू मुम्बाने बेंगळुरू बुल्सचा 46 -30 असा पराभव केला होता.
 
यावेळी रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकाविना सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी तीन सामने झाले. पहिल्या सामन्यात यू मुंबाने बेंगळुरू बुल्सचा 46 -30 असा पराभव केला. अभिषेक सिंग यू मुंबाचा स्टार रेडर होता. त्याने 19 गुण मिळवले. दुसरीकडे, रेडर चंद्रन रणजीतने बेंगळुरूसाठी 13 गुण मिळवले.
 
दुसऱ्या सामन्यात तमिळ थलायवास आणि तेलुगू टायटन्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. तेलुगूने आपला पराभव टाळण्यासाठी शानदार पुनरागमन केले आणि सामना 40-40 असा बरोबरीत सुटला. तमिळसाठी मनजीत हा सामन्यातील सुपर रेडर होता ज्याने एकूण 12 गुण जमा केले. त्याचवेळी बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात आता तिसरा सामना सुरू आहे.
 
त्याचवेळी, तिसऱ्या सामन्यात, या लीगचा स्टार रेडर आणि 1000 हून अधिक रेड पॉईंट्स जमा करणारा दाऊप किंग प्रदीप नरवालचा संघ तिसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सकडून 38-33 असा पराभूत झाला. यासह पहिला दिवस संपला. अभिषेक सिंग, मनजीत आणि मोहम्मद नबीबक्ष यांच्या रूपाने नवे स्टार्स सर्वांसमोर आहेत.
 
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर प्रो कबड्डी लीग 2021 चे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता. याशिवाय हॉटस्टारवरही तुम्ही मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. हे सामने स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी वर देखील), स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट व्यतिरिक्त स्टार स्पोर्ट्स तेलुगु आणि तमिळ इतर भाषांमध्ये पाहता येतील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Kisan : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांना मिळणार