Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कतरीना कामाबाबत गंभीर

कतरीना कामाबाबत गंभीर
IFMIFM
बॉलीवूडमधील सध्याची नंबर वन नायिका कॅटरीना कैफ सध्या यशाच्या शिखरावर असली तरी ती हवेत गेलेली नाही. आपल्या कामाबाबत ती गंभीर आहे. वेळेचा अपव्यय करणे तिला आवडत नाही.

अनेकदा शूटिंगवेळी अपघात घडूनदेखील तिने शूटिंग थांबवले नाही. राजकुमार संतोषी यांच्या 'अजब प्रेम की गजब कहानी' चे शूटिंग
सुरू होते. एका सीनमध्ये रणबीरला कॅटरीनाला थप्पड मारायची होती. रणबीरने चूक केली आणि त्याने गालाऐवजी चेह-यावर तडाखा
हाणला. हा तडाखा एवढा जबरदस्त होता की कॅटरीना रडू लागली. तातडीने रणबीरने माफी मागितली पण, तिच्या वेदना कमी होईनात. शूटिंग थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला पण, हे ऐकल्यावर मात्र तिने रडे आवरले आणि शूटिंग थांबू न देता पुन्हा काम सुरू केले. शेवटी तिचा लौकीक तिला जपायचा होता ना.

Share this Story:

Follow Webdunia marathi