Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस

कॅटरिना करणार रणबीरसोबत वाढदिवस

वेबदुनिया

WD
बॉलिवूडमधील हिट जोडी रणबीर-कॅटरिना त्यांच्यातील अफेअरबाबत काहीच बोलत नाहीत. सध्या दोघेजण पण सुट्टीवर असून स्पेनमध्ये हे दोघेजण एकत्रित फिरताना दिसत आहेत. कॅटरिना 6 जुलैला 29 वा वाढदिवस साजरा करीत आहे. हा वाढदिवस रणबीर-कॅटरिना जोडी विदेशात एकत्रित साजरा करणार असल्याचे समजते. त्यामुळे दोघांनी आता कितीपण अफेअर नसल्याचे सांगितले तरी आता त्यांच्याततील मधुर संबंधाची सर्वानाच खात्री पटली आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर-कॅटरिना दोघेही अलीकडेच दुबईत सुट्टी घालविताना दिसले होते. त्यानंतर ते दिग्दर्शक अयान मुखर्जीला भेटण्यासाठी युरोपला गेले. अजरुन कपूर आणि करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये एकत्र दिसले होते. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी रणबीर-कॅटरिना जवळ आले. काही दिवसांपूर्वीच लंडन दौर्‍यावर असताना कॅटरिना आणि रणबीरची आई नीतू सिंग एकत्र डिनर करताना आढळल्या होत्या. त्यामुळे नीतू सिंगचेही कॅटरिनाशी चांगलेच जुळत असल्याचे दिसते.

Share this Story:

Follow Webdunia marathi