सुपरहिट कतरीना
कतरीना कैफचा जन्म १६ जुलै १९८४ ला झाला. आज ती वयाची २५ वर्षे पूर्ण करतेय. लहान वयातच कतरीनाने मोठ्या यशाला गवसणी घातलीय. सलग हिट चित्रपट देऊन तिने बॉलीवूडच्या अनेक प्रस्थापित नायिकांची झोप उडवून दिलीय. कतरीना चित्रपटात असेल तर तो यशस्वी होतो, असे एक नवे समीकरण तिने जन्माला घातलेय.
स्टार कतरीना
हल्ली 'स्टार कलावंत' ही संकल्पनाच नाहीशी होतेय. अपवाद कतरीनाचा. कतरीना स्टार आहे. तिच्यात कमतरता आहे हे माहित असूनही आज कतरीना हे बॉलीवूडमधलं चलनी नाणं आहे. अभिनयात तिला अजून बरीच मजल मारायची आहे. पण निसर्गदत्त सौंदर्य नि निरागस चेहरा अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. म्हणूनच तिची लोकप्रियात आभाळाला जाऊन पोहोचलीय.
स्वबळावर यशाची कमाई
'बूम' (२००३) या अपयशी चित्रपटापासून सुरवात करणार्या कतरीनाची सुरवातीची ओळख सलमान खानची गर्लफ्रेंड अशीच होती. तिला हिंदीही नीट बोलता येत नव्हतं. पण तिने कठोर मेहनत घेतली. आता ती हिंदीही चांगलं बोलते शिवाय तिच्या अभिनयातही सुधारणा झालीय. स्वबळावर तिने इथपर्यंत मजल मारलीय.
सेक्सी आणि पॉप्युलर
कतरीनाचे फोटो इंटरनेटवर सर्वाधिक डाऊनलोड केले जातात. जगातील सेक्सी महिला म्हणून तिची निवडही झालीय. तिची लोकप्रियता किती आहे याचे हे पुरावे. आता राजनीती, अजब प्रेम की गजब कहानी यातून तिचा अभिनय येत्या काळात पहायला मिळेल. कतरीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.