वर्गात मास्तर शिकवत असतानां ते दिन्याला विचारतात
मास्तर -दिन्या तू पुण्याचा आहेस तर सांग बरं,
पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात?
दिन्या-विद्याचा जन्म पुण्यात झाला,उपवर झाल्यावर तिच्यासाठी वर संशोधनाचे प्रयत्न सुरु झाले ."विद्या विनयेन शोभते "पुणेरांकडे काही विनय नाही ,म्हणून मुंबईतल्या विनयशी तिचे लग्न लावून दिले, म्हणून तिला पुणे सोडून जावे लागले.,तरी ही तिचे माहेर पुण्यात असल्याने ,
पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात!
मास्तर शाळा सोडून कुठे गेले काहीच माहित नाही..