Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2019

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक 2019
, शनिवार, 4 मे 2019 (15:24 IST)
मुख्य लढत : विनायक राऊत (शिवसेना) विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) विरुद्ध निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
 
कॉंग्रेस पक्ष सोडून स्वतः पक्ष काढलेले नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी राणे यांनी भाजपला समर्थन दिले आहे. मात्र शिवसेने सोबत त्यांचे पटत नसल्याने ही लढत चुरशीची होणार आहे. मागील निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव झाला होता. तररत्नागिरी आणि सिधुदुर्ग हे कोकणातील भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
 
 लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भिवंडी लोकसभा निवडणूक 2019