Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

रामटेक लोकसभा निवडणूक 2019

Ramtek lok sabha election result 2019
मुख्य लढत : कृपाल तुमाणे (शिवसेना) विरूद्ध  किशोर गजभिये (काँग्रेस)
 
कृपाल तुमाने हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. तर किशोर गजभिये हे माजी सनदी अधिकारी आहेत. ते प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र सरकारमध्ये समाज कल्याण विभागात सचिव म्हणून काम केलं आहे. २०१० मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर खासगी क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर राजकारणात उतरले. २०१८ मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बसपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अहमदनगर लोकसभा निवडणूक 2019 Ahmednagar Lok Sabha Election 2019