Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक 2019

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक 2019
, शनिवार, 4 मे 2019 (14:50 IST)
मुख्य लढत : गजानन कीर्तिकर (शिवसेना) विरुद्ध संजय निरुपम (काँग्रेस)
 
गेल्यावेळी म्हणजे २०१४ साली उत्तर मुंबईतून पराभूत झालेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे यंदा उत्तर पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना टक्कर देणार आहेत. गजानन कीर्तीकर यांची प्रतिमा काम करणारे खासदार अशी आहे.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निवडणूक 2019