Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिव्यांग मतदारांसाठी 970 व्हीलचेअर विविध मतदान केंद्रावर 92 रॅम्पची व्यवस्था

दिव्यांग मतदारांसाठी 970 व्हीलचेअर विविध मतदान केंद्रावर 92 रॅम्पची व्यवस्था
, मंगळवार, 2 एप्रिल 2019 (09:38 IST)
दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा राहणार आहे. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तिंसाठी एकूण 970 व्हीलचेअर व एकूण 92 रॅम्पची व्यवथा करण्यात आली आहे.
 
राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या 2 लाख 24 हजार 162 इतकी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 4781 एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. 76 – वणी मतदारसंघात 566 दिव्यांग मतदार, 77 – राळेगाव मतदारसंघात 992 दिव्यांग मतदार, 78 – यवतमाळ मतदारसंघात 540 मतदार, 79 – दिग्रस मतदारसंघात 1530 मतदार, 80 - आर्णि विधानसभा मतदारसंघात 568 मतदार, 81 – पुसद विधानसभा मतदारसंघात 299 आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघात 286 असे एकूण 4 हजार 781 दिव्यांग मतदार आहेत.
 
दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने 16 तालुक्यात कार्यरत मतदान केंद्रावर 970 व्हीलचेअर व 92 रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित माहिती उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या 34 शाळांमधून 120 प्रशिक्षित कर्मचा-यांना मतदान केंद्रावर मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येणार आहे.सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाआघाडी महायुतीला धडा शिकवणार– नवाब मलिक