Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

भाजपकडून तिसरी यादी प्रसिद्ध महाराष्ट्रातील हे आहेत उमेदवार

bjp 3rd list
, शनिवार, 23 मार्च 2019 (10:06 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी  भाजपने पहिली , दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली, काल रात्री उशिरा (23 मार्च) तिसरी यादीही प्रसिद्ध केली आहे. प्रथम यादीत 182 उमेदवार, दुसऱ्या यादीत फक्त एक उमेदवार घोषित केला होता. आता देशातील उमेदवार असलेल्या तिसऱ्या यादीत भाजपने 36 उमेदवारांची घोषणा  केली आहे. आता नवीन प्रसिद्ध यादीमध्ये राज्यातील सहा मतदारसंघाचा समावेश असून या यादीत भाजपने बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली असून भाजपच्या तिसऱ्या यादीत जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर येथील उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीतून भारती पवार, पुण्यातून भाजपचे वरीष्ठ नेते गिरीष बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी हे उमेदवार भाजपकडून लढणार आहेत.
 
भाजपच्या तिसऱ्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं
 
गिरीष बापट, पुणे
कांचन कुल, बारामती
जयसिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
स्मिता वाघ, जळगाव
प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड
भारती पवार, दिंडोरी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोजगार देणे तर दूरच, असलेले रोजगार काढून घेण्याचे काम सुरू आहे –जयंत पाटील