Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उदयनराजेंची संपत्ती किती आहे माहित आहे का ?

उदयनराजेंची संपत्ती किती आहे माहित आहे का ?
, बुधवार, 3 एप्रिल 2019 (16:46 IST)
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. आता प्रथम आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली असून, 23 एप्रिल रोजी म्हणजे तिसऱ्या टप्प्यात साताऱ्यात निवडणुका होणार आहेत. साताऱ्यातून राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उमेदवार म्हणून उभे आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबाबत अनेकांना कुतूहल आहे. उदयनराजे भोसलेंनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीही समोर आली आहे. राजेंचे 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात वार्षिक उत्पन्न अर्थ्याने कमी झाले आहे, 2014 साली 2 कोटी असलेले वार्षिक उत्पन्न 2018 अखेरीस एक कोटीं झाले आहे. तर उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराज यांचे 2017-18 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न 8 लाख 71 हजार 774 रुपये आहे. 2013-14 : 2 कोटी 3 लाख 51 हजार 479 रुपये,2014-15 : 1 कोटी 54 लाख 89 हजार 756 रुपये,2015-16 : 1 कोटी 17 लाख 77 हजार 47 रुपये,2016-17 : 63 लाख 23 हजार 255 रुपये,2017-18 : 1 कोटी 15 लाख 71 हजार 306 रुपये,उदयनराजे भोसले यांची जंगम मालमत्ता – 12 कोटी 31 लाख 84 हजार 348 रुपये ,पत्नी दमयंतराजे यांची जंगम मालमत्ता – 81 लाख 39 हजार 254 रुपये,उदयनराजेंवर 1 कोटी 23 लाख 40 हजरा 338 रुपये बँकेचं कर्ज असून त्यांची स्थावर मालमत्ता :स्वत: खरेदी केलेली मालमत्ता – 1 कोटी 13 लाख 9 हजार 275 रुपये, वारसाप्राप्त मालमत्ता – 1 अब्ज 34 कोटी 93 लाख 20 हजार 522 रुपये,दिवंगत प्रतापसिंह महाराज भोसले (उदयनराजेंचे वडील) यांच्या नावावर वारसाप्राप्त मालमत्ता 25 कोटी 26 लाख 67 हजार 68 रुपये आहे. तर गाड्या पाहिल्या मारुती जिप्सी – 60 हजार रुपये,ऑडी – 15 लाख 60 हजार रुपये,मर्सिडिज बेन्झ – 48 लाख 165 रुपये,इन्डीवर – 27 लाख 59 हजार 885 रुपये इतक्या आहेत. जर दागिने पाहिले तर उदयनराजेंकडे दागिने, सोने, चांदी – 37,917.72 ग्रॅम (किंमत – 1 कोटी 33 लाख 75 हजार 687 रुपये),पत्नी दमयंतीराजेंकडे दागिने, सोने, चांदी – 4,750.33 ग्रॅम (किंमत – 32 लाख 98 हजार 256 रुपये),कुटुंबाकडे दागिने, सोने, चांदी – 628.50 ग्रॅम (किंमत – 23 लाख 62 हजार 200 रुपये)  इतके आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गे सेक्स करणाऱ्यांना इथे मिळणार दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा