काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजन यांने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राधाकृष्ण विखे पाटल यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे-पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारला आहेत. तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अहमदनगरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात टीका केली होती. विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले होते.