Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील लोकसभा उमेदवार सुनील तटकरे यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर धमकी देणाऱ्याच्या घराच्या पत्त्यासह माहिती पत्रात नमूद केली आहे. शिरूर पोस्ट ऑफिसमधून सुनील तटकरेंच्या नावाने पत्र म्हसळा पोस्ट ऑफिसमध्ये मिळाले आहे. या पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय म्हसळा येथील पत्ता आहे, पत्र राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात पोस्ट करण्यात आल होत. राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाजीम हासवारे यांनी हे पत्र उघडून पाहिल्यानंतर उपस्थितांना धक्काच बसला आहे. 
 
पत्रामध्ये धमकी देणाऱ्याच्या नावाचा त्याच्या पत्त्यासहित उल्लेख केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळी येथील रहिवासी सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीची असून पूर्ववैमन्यसातून काही लोकांच्या मदतीने सुनील तटकरेंना ठार मारणार असल्याचं नमूद केले आहे. तटकरे हे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेस आघाडीतर्फे रायगड-रत्नागिरी मतदारसंघाचे उमेदवार आहेत.म्हसळा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंस्टाग्रामवर नाव बदलणारा फीचर