Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनसे स्वबळावर लढणार लोकसभा, राज ठाकरे यांच्या घोषणेकडे लक्ष

मनसे स्वबळावर लढणार लोकसभा, राज ठाकरे यांच्या घोषणेकडे लक्ष
, गुरूवार, 14 मार्च 2019 (16:59 IST)
लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. तरीही राज ठाकरे यांचा करिश्मा असलेली मनसेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात दिसून येते आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबतही सस्पेन्स कायम ठेवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांची सभा घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहेत. 
 
मनसेचे पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले असून, मनसेची ताकद असलेल्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या शहरांवर मनसेचे लक्ष केंद्रीत केले आहे. निवडणुका लढवायचं ठरलं की याठिकाणी मनसे उमेदवार उभा करतील असे चित्र आहे. येत्या आठवडाभरात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत लढवणार की नाही याबाबत घोषणा करतील. 
 
शिवसेना-भाजपा युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रह धरला होता, मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध करत, मनसेला आघाडीत घेतले तर त्याचा मोठा फटका उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो अशी शक्यता काँग्रेसकडून वर्तवली आहे. 
 
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मनसे आमदाराच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य करताना पवार म्हणाले होते की, कोणताही आमदार अथवा व्यक्ती पक्ष सोडून गेल्याने तो पक्ष संपत नसतो, मनसेची ताकद राज्यात दिसून आली आहे, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ही ताकद दिसू शकते असं वक्तव्य शरद पवारांनी केले  आहे. त्यामुळे मनसे प्रमुख काय निर्णय घेतात आणि राजकीय कसा धक्का देतात हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Facebook बनवत आहे माइंड रीडिंग मशीन