लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर मतदान होणार आहे. प्रथम दोन टप्प्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्या नंतर, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केला. त्यामुळे राजू शेट्टी यांची संपत्तीही समोर आली आहे.
राजू शेट्टी यांची संपत्ती अशी आहे. रोख शिल्लक – 27 हजार रुपये ,बँक शिल्लक – 14 लाख 7 हजार 405 रुपये, शेअर्स रक्कम – 2 लाख 33 हजार 250 रुपये ,विमा रक्कम – 19 लाख 24 हजार 194 रुपये,वहान – 15 लाख 47 हजार 700 रुपये,सोन्याचे दागिने – 5 लाख 58 हजार 790 रुपये,शेत जमीन – 27 लाख 70 हजार 250 रुपये,गुंतवणूक : स्वाभिमानी दूध – 25 लाख 90 हजार रुपये,गुंतवणूक : स्वाभिमानी एमआयडीसी – 53 लाख 69 हजार रुपये, इतर गुंतवणूक – 5 लाख 30 हजार रुपये, घर बांधकाम – 74 लाख 63 हजार 800 रुपये,कर्ज रक्कम – 7 लाख 74 हजार 59 रुपये.