Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वासाचा अभाव - उद्धव ठाकरे

काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वासाचा अभाव - उद्धव ठाकरे
, सोमवार, 8 एप्रिल 2019 (08:29 IST)
लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. प्रत्येक पक्ष त्याच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत असून, युतीमधील रामटेकची जागा ही शिवसेना लढवत आहे. रामटेक येथून  शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कळमेश्वर येथील कृषी बाजार समितीच्या मैदानात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. विदर्भातून एकूण ७ जागांसाठी येत्या ११ तारखेला मतदान असून, रविवार हा प्रचारातील अखेरचा दिवस होंता. कॉंग्रेस आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी भाड्याचे बुजगावणे उभे केले असून, काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वासाचा अभावमसून, काँग्रेस पक्षात आत्मविश्वासाची उणीव असलेल्या लोकं असल्याची टीका केली उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही  देशद्रोहासारखं गंभीर कलम हटवणं सहन करणार नाही. दाऊद परत आला तर त्याच्यावरील असलेले कलम काढणार का ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.राहुल गांधीनी देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, देशद्रोह्यांना कडक शासन करत फासावर लटकवणारे सरकार हवयं की, त्यांचे लांगुलचालन करणारे सरकार हवे? असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थितांना केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कासाची वल्गना करणारे लवकरच गायब होतील - संग्राम जगताप