Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निवडणूक निकाल २०१९: मोदी, शहा, इराणी आघाडीवर

लोकसभा निवडणूक निकाल २०१९: मोदी, शहा, इराणी आघाडीवर
, गुरूवार, 23 मे 2019 (11:02 IST)
वाराणसीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
गांधीनगरातून अमित शहा आघाडीवर
अमेठीहून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर
वायनाडमधून राहुल गांधी आघाडीवर 
बेगुसरायमधून भाजप उमेदवार गिरीराज सिंह पुढे
काँग्रेसचे शशी थरूर पिछाडीवर
 
गुजरात राज्यात भाजप सर्व २६ जागांवर आघाडीवर
मध्य प्रदेशात भाजपला २८ जागांवर आघाडी 
उत्तर प्रदेशात एनडीए ५५ जागांवर आघाडीवर


लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुप्रिया सुळे 193682 मतांसह आघाडीवर