Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा क्रांती मोर्चाची निवडणुकीतून माघार, देणार या पक्षाला पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाची निवडणुकीतून माघार, देणार या पक्षाला पाठिंबा
संपूर्ण राज्याला आपली ताकद दाखवत साकारला धारेवर धरणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा लवकरच निर्णय घेणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता माघार घेतली आहे. त्यांनी आय  निवडणूक न लढवता मराठा क्रांती ठोक मोर्चा लवकरच भाजपला आगामी निवडणुकीत पाठिंबा जाहीर करण्याची जोरदार शक्यता आहे. 
 
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह ठोक मोर्चातील प्रतिनिधी आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची मुंबईत आज एक बैठक  झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला जो  न्याय दिला, तेवढा कोणत्याही सरकारने दिला नाही. . त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाने निवडणूक न लढवता भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा द्या  अशी विनंती मेटे यांनी मोर्चाच्या प्रतिनिधींना केली आहे. मराठा आरक्षणासह, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतीगृह असे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतले आहेत. तर काही जाहीर केलेल्या निर्णयांची अंमलबजावणी अजून बाकी आहे. या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी परत भाजपाचे सरकार सत्तेवर यायला हवे. यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने भाजपाला पाठिंबा द्यावा अशी विनंती मेटे यांनी केली.
 
विनायक मेटेंच्या विनंतीबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चा सकारात्मक असल्याचं आबासाहेब पाटील यांनी सांगितल आहे. त्यामुळे पुन्हा मोठे राजकीय समीकरण बदलले असून भाजपच्या हाती मोठी व्होट बँक असणार आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राणे यांचा विषय माझ्या कक्षेत नाही - चंद्रकांत दाद पाटील