वाराणसीतून नरेंद्र मोदी यांचा 1,52,513 मताधिक्याने विजय झाला आहे. ते या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या विजयाच्या फरकाने लक्षणीय घट झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, पंतप्रधानांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 513 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार अजय राय म्हणाले की, मोदीजींना जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला.
मात्र यावेळी मोदींच्या विजयाच्या अंतरात लक्षणीय घट झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी सपाच्या शालिनी यादव यांचा 4 लाख 79 हजार 505 मतांनी पराभव केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांचा 3 लाख 71 हजार 784 मतांनी पराभव केला होता.
अजय राय म्हणाले की त्यांना जिंकण्यासाठी घाम गाळावा लागला: उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आणि वाराणसी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अजय राय म्हणाले की पंतप्रधान मोदी 3 तास मागे होते. दीड लाख मतांनी विजयी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. रायबरेलीमधून राहुल गांधी 4 लाख मतांनी विजयी होत आहेत. यावरून भारतात राहुल गांधींची लोकप्रियता मोदींपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे सिद्ध होते.