Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कहीं खुशी कहीं गम

कहीं खुशी कहीं गम

वार्ता

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यावेळी अनेक उलथापालथी घडविल्या. अनेक बड्या नेत्यांनी सहज विजय मिळवला, तर अनेकांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले भाजपचे नेते वरूण गांधी यांनी पीलभीतमधून विजय मिळवला. शिवाय त्यांच्या मातोश्री मेनका गांधी या मतदार संघ बदलूनही आवला येथून विजयी झाल्या. गांधी घराणेही या निवडणुकीत विजयी ठरले. सोनिया गांधी व राहूल अनुक्रमे रायबरेली व अमेठीमधून विजयी झाले.

युपीएच्या मंत्रिमंडळात केंद्रिय मंत्री असलेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांना मात्र हाजीपूरमधून पराभव पत्करावा लागला. एकदा त्यांनी याच जागेवरून पाच लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवत विक्रम केला होता. यावेळी मात्र संयुक्त जनता दलाचे रामसुंदर दास यांनी पासवान यांना ३७ हजार ९५४ मतांनी अस्मान दाखवले.

वाराणसीत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी समाजवादी पक्षाचे गुंड उमेदवार मुख्तार अन्सारी यांना आडवे पाडले. गेल्या वेळी अलाहाबादमधून पराभूत झालेल्या जोशींनी यावेळी मतदारसंघ बदलला होता. भाजपचे 'बोलभांड' नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू अमृतसरमधून व अभिनेता कम नेता शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिबमधून लोकसभेत जाण्यात यशस्वी ठरले.

मध्य प्रदेशातून छिंदवाडा येथून केंद्रीय मंत्री कमलनाथ विजयी झाले, र बिहारमधील सारण येथून रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे भाजपचे राजीवप्रसाद रूडी यांचा पराभव करून विजयी झाले. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी मधेपुराची जागा राखली आहे.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांनी झालावडमधून विजय मिळवला. तर उत्तर प्रदेशमधील चर्चित लढत ठरलेल्या रामपूरहून अभिनेत्री जयाप्रदा प्रचंड विरोधातही लोकसभेत जाण्यात यशस्वी ठरल्या. याच मतदारसंघात भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले.

Share this Story:

Follow Webdunia marathi