लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजधानी दिल्लीसह आठ राज्यांमधील 85 जागांवर मतदान झाले. चौथ्या टप्यात सरासरी 57 टक्के मतदान झाले
चौथ्या टप्प्यात पंजाबमध्ये सरासरी 65 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 7 5 टक्के आणि हरियाणा आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6 3 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली. उत्तरप्रदेशात 50 टक्के मतदान झाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 24 टक्के सरासरी मतदान झाले.
चौथ्या टप्यातील निवडणुकीत भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी, शत्रुघ्न सिन्हा, सपा नेते मुलायम यादव, रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी या नेत्यांचे भाग्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले.
राजधानी दिल्लीच्या सात, बिहारच्या तीन, राजस्थानच्या 25 पश्चिम बंगालच्या 17, जम्मूतील एका जागेवर तर उत्तर प्रदेशच्या 18 जागांसाठी मतदान पार पडले.