Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिसर्‍या टप्प्यात देशभरात ५० टक्के मतदान

तिसर्‍या टप्प्यात देशभरात ५० टक्के मतदान

वार्ता

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात देशभरातील १०७ मतदारसंघांत प्रारंभिक आकडेवारीनुसार सरासरी पन्नास टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नऊ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील १०७ मतदारसंघात १४ कोटी ४० लाख दोन हजार २६५ मतदारांपैकी पन्नास टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे आता १०१ महिलांसह १५६७ उमेदवारांचे भवितव्य आता मशीनबंद झाले आहे.


सर्वांत जास्त म्हणजे ६५ टक्के मतदान पश्चिम बंगाल व सिक्कीममध्ये तर सर्वांत कमी २५ टक्के जम्मू- काश्मीरमध्ये झाले. दादरा नगर हवेली आणि दमण व दीवमध्ये प्रत्येकी ६० टक्के, कर्नाटकमध्ये ५७, गुजरातमध्ये ५०, बिहारमध्ये ४८, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात ४५ टक्के मतदान झाले.

या तिसर्‍या टप्प्यामुळे लोकसभेच्या ५४३ पैकी ३७२ मतदारसंघांसाठी मतदान पूर्ण झाले आहे.

मतदानाची राज्यवार टक्केवारी अशी
राष्ट्रीय .. 50 पश्चिबंगाल .. 65 सिक्किम .. 65 दादरनगहवेली .. 60 दमदीव .. 60 कर्नाटक .. 57 गुजरात .. 50 बिहार .. 48 मध्प्रदेश .. 45 उत्तप्रदेश .. 45 महाराष्ट्र .. 45 जम्मकश्मीर .. 25

Share this Story:

Follow Webdunia marathi