Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिसऱ्या आघाडीची बैठक रद्द

तिसऱ्या आघाडीची बैठक रद्द

भाषा

निवडणूक निकालांवर चर्चा करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने सोमवारी बोलावलेली आपली बैठक रद्द केली आहे.

निवडणूकीत तिसऱ्या आघाडीला मोठा फटका बसला असून, परंपरागत गड असलेल्या पश्चिम बंगालमध्येही डाव्यांना पराभवाचे पाणी चाखावे लागले आहे. यानंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी डाव्या पक्षांनी सोमवारी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलावली होती.

रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी ( आर एस पी) चे सरचिटणीस टी जे चंद्रचूडन यांनी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर सोमवारची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi