Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची 'मनमोहन' संधी

दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची 'मनमोहन' संधी

भाषा

सलग दोन वेळा पंतप्रधान झालेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या रूपाने होणार असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभिक निकालानुसार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीने जागांच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली असून नियतीने पंतप्रधानपदाची माळ डॉ. मनमोहनसिंगांच्या गळ्यात घालण्याची तयारी सुरू केली आहे.

कॉंग्रेस आघाडीला २४२ ते २५० जागा मिळतील अशी शक्यता आहे. बहुमतासाठी २० ते ३० जागा कमी पडण्याची शक्यता आहे. इतर पक्षांची मदत घेऊन ही कमतरता भरून काढली जाऊ शकते.

१९९९ मध्ये वाजपेयींनी सत्तेत पुनरागमन करताना पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यावेळी मनमोहनसिंगही या इतिहासाची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. मागील वेळी पंतप्रधानपदाची माळ अनपेक्षितरित्या मनमोहनसिंगांच्या गळ्यात पडली होती. यावेळी मात्र कॉंग्रेसने साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मनमोहनसिंग यांच्या रूपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला. कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी व युवा नेते राहूल गांधी यांनी आपले संपूर्ण बळ मनमोहन यांच्या मागे उभे केले होते. त्यांच्या उमेदवारीवर चर्चा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही घेतली होती.

डॉ. मनमोहनसिंग यांनी यावेळी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास दुसर्‍यांदा पंतप्रधान होणारे गांधी नेहरू घराण्याबाहेरील व कॉंग्रेसमधील ते पहिलेच असतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi