Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान नाही झालो तर राजकारण सोडेन- अडवानी

पंतप्रधान नाही झालो तर राजकारण सोडेन- अडवानी

वार्ता

पंतप्रधान नाही झालो तर राजकारण सोडून देईन, असे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

आऊटलुकला दिलेल्या मुलाखतीत अडवानी म्हणाले, की राजकारण सोडण्याचा माझा विचार आधीच झाला होता. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास मी तसाच निर्णय घेईन.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता केंद्रात आल्यास स्विस बॅंकेत जमा असलेला भारतीय काळा पैसा शंभर दिवसाच्या आत परत आणू असेही ते म्हणाले. पंतप्रधान नाही झाले तर काय कराल, असे विचारले असता, हे पक्षावर अवलंबून असून, पक्षाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. वास्तविक मी आत्मरचरित्रात्मक पुस्तक लिहित असतानाच आपण आता ८० वर्षांचे झालो आहोत. त्यामुळे राजकारण सोडायला हवे असा माझा विचार झाला होता. पण आता परत तशीच स्थिती उद्भली तर मी तसा निर्णय घेईन.

निवडणुकीनंतर तिसर्‍या आघाडीचे सरकार बनण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi