लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी संपली असून, उद्या (ता. 7) रोजी होणाऱ्या मतदानादरम्यान परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह, सपा नेते मुलायम सिंह यादव, रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव निवडणूक रिंगणात आहेत.
आठ राज्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 85 जागांवर या मतदान घेतले जात असून, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी या प्रचाराची रणधुमाळी अखेर संपली. आता या दिग्गजांचे भवितव्य जनता उद्या ठरवणार आहे.