Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील महिला खासदारांची संख्या घसरली

राज्यातील महिला खासदारांची संख्या घसरली

वार्ता

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महिलांचे प्रतिनिधित्व घसरले आहे. जेमतेम तीनच महिला ही निवडणूक जिंकू शकल्या. गेल्या निवडणुकीत ही संख्या सहा होती.

राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी ८१९ उमेदवार यावेळी उतरले होते. त्यात ५५ महिला होत्या. यातल्या तिघीच लोकसभेत पोहोचू शकल्या. गेल्या निवडणुकीत तुलनने २९ महिलाच उमेदवार होत्या. पण निवडून गेल्या पाच. त्यानंतर सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत श्री. दत्त यांची कन्या प्रिया विजयी झाल्याने या महिलांची संख्या सहावर गेली.

यावेळी उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, बारामतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी या विजयी झाल्या आहेत.

निवडणूक पराभूत झालेल्या प्रमुख महिलांत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (हिंगोली), हातकणंगलेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार निवेदिता माने यांचा समावेश आहे. लातूरमधून गेल्यावेळी निवडून गेलेल्या भाजपच्या रूपाताई निलंगेकर यांनी निवडणूक लढवली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi