Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजयला निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा कट- जया बच्चन

संजयला निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा कट- जया बच्चन

भाषा

अभिनेता संजय दत्तला निवडणूक लढविण्यापासून दूर ठेवण्यामागे कारस्थान असल्याचा जावईशोध समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी लावला आहे.

संजयला निवडणूक लढता येऊ नये यासाठी अडचणींचा डोंगर त्याच्यापुढे उभा करण्यात आला. त्याला निवडणूक लढवता येऊ नये यासाठीच कट रचण्यात आला. पण तरीही आम्ही त्याला पक्षाचा सरचिटणीस बनविले आहे, असे बच्चन यांनी जोगेश्वरीमध्ये एका प्रचार सभेत सांगितले.

मुंबईतील उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी कॉंग्रेसला जबाबदार ठरवत त्यांना उत्तर प्रदेशमध्ये भाजप व बहूजन समाज पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात काय घडले ते सर्वांनाच माहिती आहे, त्याला कोण जबाबदार आहेत, त्यंची नावे मला घ्यायची नाहीत. पण यासाठी कॉंग्रेस जबाबदार आहे हे नक्की अशी टीकाही त्यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi