Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अडवानींच्या नेतृत्वासाठी उमांचा आग्रह

अडवानींच्या नेतृत्वासाठी उमांचा आग्रह

वार्ता

लालकृष्ण अडवानी यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर रहावे असे आवाहन भारतीय जनशक्तीच्या नेत्या साध्वी उमा भारती यांनी केले आहे. बाकीच्या नेत्यांनी अडवानींची समजूत काढावी अशीही सूचना त्यांनी केली आहे. उमांनी आज अडवानींची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

अडवानी हेच सर्वमान्य नेता आहेत . त्यांच्यासारखा नेता दुसरा नाही हे लक्षात घेऊन सद्यपरिस्थितीत त्यांनी हे पद सोडू नये असे उमांचे म्हणणे आहे. यापूर्वी पराभूत झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसच्या नेत्यांनीही पद सोडले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Share this Story:

Follow Webdunia marathi