हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील महान गायिका गंगूबाई हनगल यांनी वयाच्या ९७ व्या वर्षीही लोकशाहीवरील आपला मजबूत विश्वास दाखवून देत मतदान केले.
गंगूबाईंनी देशपांडे नगर येथील मतदान केंद्रावर सकाळीच जाऊन मतदान केले. मतदानाचा अधिकार वाया घालवू नका असे आवाहन करतानाच सरकार स्थापनेत आपलाही सहभाग लोकांनी सिद्ध करावा असे त्यांनी सांगितले. आपण कधीही मतदानाचा हक्क वाया जाऊ दिला नाही, हे सांगतानाच मताधिकार आवर्जून वापरावा असे त्या म्हणाल्या. गंगूबाईंचे हे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत.