पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अहमदाबाद येथील सभेत आज त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न एका विद्यार्थ्याने केला.
पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच, अचानक समोरच बसलेल्या हितेश चौहान नावाच्या विद्यार्थ्याने त्यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित हितेशला अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात केली जात आहे.
यापूर्वी पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम, कॉग्रेस नेते नवीन जिंदल यांच्यावर अशाच स्वरुपाचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आता पंतप्रधानांवरच अशा स्वरुपाचा हल्ला करण्यात आल्याने सुरक्षाव्यवस्थांचे धाबे दणाणले आहेत.
ही मोदींचीच संस्कृती- कॉंग्रेस
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीच अशा स्वरुपाच्या संस्कृतीला खतपाणी घातल्याने राज्यात अशा लोकांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसचे नेते विरप्पा मोइली यांनी या घटनेचा निषेध केला आहे.