पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. दुसऱ्या टप्प्यात मतदारांमधील हा उत्साह ओसरला असून, कर्नाटक, ओरिसात तीन तासात केवळ दहा टक्केच मतदानाची नोंद झाली आहे.
या दोनही राज्यांमध्ये सकाळी नऊ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या घराजवळील एका शाळेत मतदान केले. तर कर्नाटकात राज्याचे माजी मुख्यमंत्री वीराप्पा मोइली यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला.