कॉंग्रेस व डावे आत्ताच्या घडीला एकत्र येणे शक्य नाही, असे मत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस व डाव्यांना एकत्र आणता येईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यावर मुखर्जी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांनी ही शक्यता व्यक्त केली असली तरी हे आत्ता घडेल असे मला वाटत नाही, असे सांगून पुढे काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. कारण आपल्यापैकी कुणीही राजकीय ज्योतिषी नाही, असेही मुखर्जी म्हणाले.
पवारांनी नेहमीच मोघम संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत असणे गरजेचे नाही, अशी मल्लिनाथीही मुखर्जी यांनी केली.