लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात आज राजधानी दिल्लीतील सात जागांवर मतदान सुरू झाले असून, कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीसह देशभरात कॉग्रेसलाच बहुमत मिळणार असल्याचा दावा त्यांनी या प्रसंगी केला.
35 लोदी इस्टेटपासून जवळच एका मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केल्यानंतर मतदारांना आवाहनही केले. मतदारांनी आपला हक्क बजावत देशाचा विकास करणाऱ्या पंतप्रधानांना निवडून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.