लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान छत्तीसगडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आज राज्यातील 25 मतदान केंद्रावर पुनर्मतदान करण्यात येत आहे.
बस्तर लोकसभा जागेसाठी 20 मतदान केंद्रावर, बस्तरसाठी चार तर कोरबा एका मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आहे.
आज या भागात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये या जागांवर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवल्याने मतदान रद्द करण्यात आले होते.