उत्तर प्रदेशच्या रामपुर जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या सपा उमेदवार अभिनेत्री जयाप्रदा यांच्या विरोधात टिकल्या वाटल्या प्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 एप्रिल रोजी आचार संहिता लागू झाली असताना जयाप्रदा यांनी आपल्या मतदार क्षेत्रात महिलांना टिकल्या वाटल्या.
या टिकल्यांवर सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे चित्र असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.