केंद्रिय माहिती व प्रसारण राज्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज मतदान करू शकले नाहीत. गुणा लोकसभा मतदारसंघातून ज्योतिरादित्य लढत आहेत. मात्र आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सक्रिय असलेल्या ज्योतिरादित्य यांना मतदानासाठी ग्वाल्हेरला जाता आले नाही.
ग्वाल्हेरमधून भाजपतर्फे त्यांचीच बहिण यशोधरा शिंदे निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे त्याही शेजारच्या शिवपुरी जिल्ह्यात सक्रिय असल्याने स्वतःसाठी मतदान करू शकल्या नाही.