निवडणूक आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात अडकल्यानंतर संजूबाबा आता बोलताना थोडा विचार करून बोलायला लागल्याचे दिसतेय. येथे घेतलेल्या एका प्रचार सभेत 'मी गांधीगिरी करेन, झप्पी देत राहीन, पण पप्पी देणार नाही', असे त्याने सांगितले.
मायावतींना झप्पी देण्यास पप्पी घेण्यास आपण तयार असल्याचे त्याने एका प्रचार सभेत सांगितले होते. त्यावरून आचारसंहिता भंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता. त्याचा संदर्भ देताना 'मी माझ्याविषीय बोलत असलो की बहनजी खटला दाखल करतात. पण त्या कितीही चिडल्या तरी मी त्यांना 'झप्पी' देण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. या सभेत अमरसिंह यांचेही भाषण झाले.